बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कधी महागडे कपडे तर कधी महागड्या पर्सने लोकांना सरप्राईज करते.पण आता अभिनेत्री तिच्या एका उपचाराच्या पद्धतीमुळे चर्चेत आली आहे.

Dec 19,2023


अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या ब्युटी ट्रीटमेंटचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तिची डिटॉक्स प्रेसोथेरपी सुरू आहे.


उर्वशीने तिचे दोन फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. या दोन्ही फोटोंमध्ये उर्वशी रौतेलाच्या शरीराला एका मशीनला जोडण्यात आले आहे.


उर्वशीने स्वतःला आराम देण्यासाठी प्रेसोथेरपी सेशल घेतले आहे. प्रेसोथेरपी हा एक उपचार आहे ज्याद्वारे शरीराच्या काही भागांना हवेच्या दाबाने मालिश केले जाते ज्याला कॉम्प्रेशन आणि डीकंप्रेशन म्हटलं जातं.


उर्वशी रौतेला तिच्या संपूर्ण शरीरावर ही थेरपी लागू केली आहे. ही थेरपी डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते. हे वॉटर रिटेंशन देखील कमी करते आणि लिम्फॅटिक प्रवाहाला प्रोत्साहन देते. या थेरपीमुळे खूप आराम मिळतो.


या थेरपीच्या एका सेशनसाठी तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागते. ही थेरपी तणावमुक्त राहण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, ज्यामुळे कामावर लक्ष केंद्रित आणि उत्साही राहण्यासाठी शक्ती मिळते.


या थेरपीच्या एका सत्राची किंमत सुमारे 60 मिनिटांसाठी 80 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. हे दर महिन्याला किमान 2-3 वेळा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे उर्वशीनेही स्वतःची काळजी घेण्यासाठी ही थेरपी घेतली आहे.


याआधी देखील उर्वशीने कपिंग थेरपीचे फोटो शेअर केले होते. ही चायनीज थेरपी खूप वेदनादायक असते. या थेरपीमध्ये शरीरातील घाण बाहेर काढली जाते.

VIEW ALL

Read Next Story