इंग्रजी, हिंदी भाषेसह आता प्रादेशिक भाषेतही अनेक वेबसिरीज बनत आहेत आणि त्या डब करून हिंदीसह इतर भाषेतही प्रसारित केल्या जात आहेत

वेबसिरीजच्या या दुनियेत कित्येक मराठी वेबसिरीजही दाखल झाल्या आहेत. आज मराठीमधील टॉप ५ वेबसिरीजच कोणत्या याबद्दल माहिती घेऊया

शांतीत क्रांती ही तीन मुलांची विनोदी गोष्ट आहे. जी त्यांच्या अस्तित्वातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी गोव्याला जाण्याचा निर्णय घेतात आणि त्याऐवजी लोणावळ्यातील एका ध्यान शिबिरात जातात. ही वेबरिज सर्वात हिट झालेल्या मराठी वेबसिरीजपैकी एक आहे. सोनी लाईव्हवर तुम्ही ही वेबसिरीज पाहू शकता.

'समांतर'

जर दोन व्यक्तींचं नशीब सारखं असेल. समान तळहातावरच्या रेषा, तर काय होईल? समांतर ही कुमार महाजन या तरुणाची कथा आहे, ज्याचा शोध घेण्याच्या प्रवासात गेल्यानंतर त्याचे आयुष्य बदलतं ही वेबरिज सर्वात हिट झालेल्या मराठी वेबसिरीजपैकी एक आहे. MX PLAYER वर तुम्ही ही वेबसिरीज पाहू शकता.

'काळे धंदे'

२०१९ साली झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली 'काळे धंदे' ही वेबसिरीज म्हणजे वेबसिरीजच्या दुनियेला साजेशी अशी बोल्ड सीन्स आणि शिव्यांची खैरात असणारी वेबसिरीज आहे. ही एक कॉमेडी वेबसिरीज आहे ही वेबरिज सर्वात हिट झालेल्या मराठी वेबसिरीजपैकी एक आहे. झी 5 वर तुम्ही ही वेबसिरीज पाहू शकता.

'रानबाजार'

रानबाजार ही वेबसिरीज सस्पेन्स, थ्रिलर, पॉलिटिकल ड्रामा प्रकारातली मर्डर मिस्ट्री आहे. राजकारण्यांसाठी तीनच गोष्टी महत्वाच्या असतात सत्ता, खुर्ची आणि पैसा. यासाठी ते वाट्टेल त्या थराला जाऊ शकतात हे या सिरीजमध्ये खूप उत्तमरित्या दाखवण्यात आलं आहे. ही वेबरिज सर्वात हिट झालेल्या मराठी वेबसिरीजपैकी एक आहे. प्लॅनेट मराठीवर तुम्ही ही वेबसिरीज पाहू शकता.

अनुराधा

'अनुराधा' ही वेबसिरीज सस्पेन्स थ्रिलर वेबसिरीजचं एक उत्तम उदाहरण आहे. IMDB वर या वेबसिरीजला ९.१ रेटिंग मिळालं आहे. यामध्ये ‘कोर्ट रूम ड्रामा’ चित्रित करण्यात आला असून सिरीजची कहाणी संपूर्णपणे वेगळी आणि रोमांचक आहे. ही वेबरिज सर्वात हिट झालेल्या मराठी वेबसिरीजपैकी एक आहे. प्लॅनेट मराठीवर तुम्ही ही वेबसिरीज पाहू शकता.

VIEW ALL

Read Next Story