डी - डे (D-Day)

निखील अडवाणी दिग्दर्शित D-Day हा चित्रपट पाकिस्तानी गॅंगस्टर इकबाल सेठ उर्फ गोल्डमॅनवर आधारित आहे. या चित्रपटात ऋषी कपूर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

हसीना

हा चित्रपट दाऊद इब्राहिमची बहिण आणि ड्रग माफिया हसीना पारकरच्या आयुष्यावर आधारीत आहे. पतीच्या हत्येनंतर हसीना पारकर अंडरवर्ल्डसोबत जोडली गेली होती

ब्लॅक फ्रायडे

अनुराग कश्यपचा ब्लॅक फ्रायडे हा चित्रपट दाऊद आणि टायगर मेमनवर आधारित आहे. 1993 मध्ये मुंबई घडवलेल्या साखळी बॉम्बस्फोटांवर हा चित्रपट आधारित होता.

शूट आऊट अॅट लोखंडवाला

हा चित्रपट मुंबईतील लोखंडवाला येथील एन्काऊंटरवर आधारित होता. चित्रपटात मुंबईतील गुन्हेगार 'माया डोळस (विवेक ओबेरॉय)'चा एन्काऊंटर 'एसपी शमशेर खान' (संजय दत्त) यांनी केलेला दाखवला आहे. (फोटो सौजन्य - wikipedia)

शूट आऊट अॅट वडाळा

मुंबई क्राईम वर्ल्डमधील डॉन मन्या सुर्वे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमने मन्या सुर्वे भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य - wikipedia)

कंपनी

राम गोपाल वर्मांचा 'कंपनी' हा चित्रपट दाऊद इब्राहिम आणि छोटा राजनवर आधारित होता. या चित्रपटात अजय देवगण आणि विवेक ओबेरॉयने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या

VIEW ALL

Read Next Story