माथी टीळा, गळ्यात माळा...

माथी टीळा, गळ्यात माळा अन् मुखी कृष्णकथा! कलाविश्व सोडून मराठमळी अभिनेत्री अध्यात्माच्या वाटेवर

अनघा भोसले

ही अभिनेत्री म्हणजे अनघा भोसले. 'अनुपमा' या गाजलेल्या मालिकेतून अनघा प्रेक्षकांच्या भेटीला आली. पण, कृष्णभक्तीत ती अशी काही रमली की त्यातच आयुष्य वाहण्याचा निर्णय तिनं घेतला.

इस्कॉनपासून गोवर्धनपर्यंत...

इस्कॉन मंदिर म्हणू नका किंवा गोवर्धन गावात सेवा देणं म्हणू नका. अनघानं कणाकणात राधाकृष्णाचं अस्तित्वं पाहण्यास सुरुवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं कृष्णकथा सर्वांपुढं आणली.

कृष्णविचार

अनघा तिच्या प्रत्येक पोस्टमधून एखादा कृष्णविचार मांडत असते. जीवनातील कठीण वळणांवरही आपली नौका गुरुच तरून नेतो यार अनघाचा प्रचंड विश्वास.

आयुष्य सुंदर आहे

आयुष्य सुंदर आहे, जेव्हा तुम्ही ते राधा-कृष्णासाठीच जगता असंही ती न चुकता सांगते.

कृष्णाच्या सानिध्ध्यात

जेव्हा तुम्ही कृष्णाच्या सानिध्ध्यात असता तेव्हा कोणताही प्रसंग हताश किंवा उदास नसतो. किंबहुना हा तो क्षण असतो जिथं आपण उत्साही आणि कमालीचे सकारात्मक असतो असं ती म्हणते.

संस्कृतीच आपली ओळख

अनघानं एका पोस्टमध्ये म्हटलंय, आपली संस्कृतीच आपली ओळख आहे. त्यामुळं संस्कृतीचं पालन करण्यात कधीच कमीपणा वाटून घेऊ नका

तुझं कर्म

तुझं कर्मच आहे जे तुझ्यासमवेत जाणार आहे... गंगेच्या काठावर बसून ही कृष्णवचनं अनघालाही वेगळीच अनुभूती देऊन गेले

VIEW ALL

Read Next Story