तेजस्विनीनं तिच्या ‘अथांग’ या वेब सीरिजच्या निमित्तानं सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांना दिलेल्या पॉडकास्ट मुलाखती दरम्यान, हा खुलासा केला होता. (Photo Credit : Tejaswini Pandit Instagram)
तेजस्विनी म्हणाली, 'तुमची परिस्थिती तसेच तुम्ही कलाक्षेत्रात काम करत आहात हे पाहून तुम्हाला अशा गोष्टी विचारल्या जातात.'
पुढे तेजस्विनी म्हणाली, 'मी अशा गोष्टी करायला येथे आली नाही. अन्यथा मी भाड्याने राहिले नसते. कलाक्षेत्रामध्ये मला अशाच पद्धतीने पैसे कमवायचे असते तर मी गाड्या, घर असं काय काय खरेदी केलं असतं.'
तेजस्विनी म्हणाली, '2009 आणि 2010 ची घटना आहे. मी घरभाडं देण्यासाठी गेले आणि त्या व्यक्तीने मला थेट ऑफर केली. त्याने जेव्हा मला ऑफर केली त्याक्षणी माझ्या समोर फक्त एक पाण्याचा ग्लास होता. मी त्याच ग्लासातलं पाणी त्या व्यक्तीच्या तोंडावर फेकलं.'
तेजस्विनी म्हणाली, 'एक आंबा नासका निघाला की बाकी सगळे नासके आहेत असं म्हटलं जातं. किंवा दुसरे आंबे नासके आहेत का? हे बघितलं जातं.'
तेजस्विनी जेव्हा घर भाडं देण्यासाठी नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये पोहोचली होती तेव्हा तिला कळालं की त्या लोकांच्या आपल्या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे.
तेजस्विनी सिंहगड रोडला राहत असताना तिनं एका नगरसेवकाचं घर भाड्यावर घेतलं होतं.
तेजस्विनीला तिच्या करिअरच्या सुरुवातीला एका नगरसेवकाकडून वाईट अनुभव आला होता. त्याविषयी तेजस्विनीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
आज 23 मे रोजी तेजस्विनीचा वाढदिवस आहे. 1986 साली पुण्यात तिचा जन्म झाल होता.