'मी हिंदूच...'

'मी हिंदूच...', म्हणत 'तारक मेहता...' फेम 'बबिता' मशिदीत गेली अन् बेक्कार ट्रोल झाली

मालिका आणि वाद

मालिकेशी संबंधित कलाकारांच्या नावावरून अनेक वाद झाले, निर्मात्यांवर गंभीर आरोपही झाले.

मुनमुन दत्ता

या चर्चा शमण्याचं नाव घेत नाहीत तोच आता मालिकेतील अभिनेत्री मुनमुन दत्ताही नजरा वळवत आहे.

सोशल मीडियावर फोटोंचीच चर्चा

निमित्त आहे ते म्हणजे तिनं सोशल मीडियावर नुकतेच पोस्ट केलेले काही फोटो

बबिता

'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची बबिता म्हणजेच मुनमुन नुकतीच दुबईला गेली होती. अबू धाबीमधून तिनं या सफरीचे काही फोटोही शेअर केले.

देश तसा वेश

फोटोंमध्ये ती एका भव्य आणि तितक्याच सुरेख मशिदीत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिथं तिनं देश तसा वेश केल्याचंही पाहायला मिळत आहे.

आपण एक हिंदू असून...

हे फोटो पोस्ट करताना तिनं आपण एक हिंदू असून, जर एकाद्या देशाला किंवा एखाद्या संस्कृतीला आपण जवळून न्हाहाळतो तर, त्याचा पूर्ण आदर करतो असं कॅप्शनमध्ये म्हटलं.

फोटो चर्चेचा विषय

तिचे हे फोटो पाहता पाहता चर्चेचा विषय ठरले. अनेकांनीच ते लाईक केले. पण, काहींनी मात्र त्याच्यावर नाराजी व्यक्त केली.

नेटकऱ्यांच्या कमेंट

काहींनी 'जय श्री राम' अशा कमेंट करत तिच्या या फोटोंना ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी तर तिला अनफॉलोही केलं.

वाईटरित्या ट्रोल

काही फोटो पोस्ट करत मुनमुनला वाईटरित्या ट्रोल केलं गेलं. एखाद्या गोष्टीचा विरोध करत आपण किती श्रेष्ठ हे दाखवून देणाऱ्यांना आता ती कशी उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं असेल.

VIEW ALL

Read Next Story