बेबी बम्प फ्लॉन्ट करत स्वरा भास्करचे पतीसोबतचे रोमँटिक क्षण
अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. तिने 16 फेब्रुवारी 2023 ला सपा नेते फहाद अहमदसोबत लग्न केलं.
लग्नाच्या 4 महिन्यांनंतरच तिने गूड न्यूज दिली. 6 जूनला तिने प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं.
पती फहादसोबतचा एक फोटो शेअर करत तिने पोस्ट लिहिली होती की, 'कधीकधी तुमची प्रार्थना स्वीकारली जाते. नवीन प्रवासात पाऊल ठेवण्यास उत्सुक आहे.'
स्वरा तिच्या प्रेग्नेंसी पीरियडचा आनंद घेत असून सोशल मीडियावर अनेकदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतेच तिने पती फहादसोबत मॅटर्निटी फोटोशूट केलं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलं आहे. यामध्ये तिने फ्लोरल गाऊन तर फहादने साधा शर्ट ट्राउजर घातल्याचं दिसत आहे.
या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे की, 'कधीकधी आयुष्य तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त आशीर्वाद देतो. तसंच तुम्हाला असा प्रवास अनुभवायला मिळतो जिथे तुम्हाला स्वतःला आणि एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते.
स्वराने पुढे म्हणाली की, 'आमच्या आयुष्यातील हा सुंदर क्षण सहज आम्ही टिपला आहे. हा क्षण अतिशय आरामदायक होता. एका फोटोमध्ये स्वरा आणि फहाद एका छत्रीखाली रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.