प्रभास

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. फक्त आपले चित्रपट नाही तर अभिनय कौशल्याने ते सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

विजय सेतुपती

बाहुबलीपासून ते RRR पर्यंत या चित्रपटांनी बॉलिवूडवर आपली छाप सोडली आहे. पण जर हे दाक्षिणात्य अभिनेते साधू असते तर कसे दिसले असते?

कमल हासन

दाक्षिणात्य अभिनेत्यांचा साधू रुपातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. wild.trance या इन्स्टाग्राम युजरने हे फोटो तयार केले आहेत.

महेश बाबू

हे फोटो पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

सूर्या

या फोटोंमध्ये अभिनेते एकदम साधूंप्रमाणे दिसत नसले तरी त्यांचे कपडे मात्र त्या पद्धतीचे आहेत.

ज्युनिअर एनटीआर

युजरने हे फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, जर दाक्षिणात्य अभिनेत्यांनी आपलं करिअर चित्रपटाऐवजी साधू म्हणून सुरु केलं असतं तर काय झालं असतं.

अल्लू अर्जून

युजरने Midjourney च्या सहाय्याने हे फोटो तयार केले आहेत.

धनुष

Midjourney चा वापर करण्यासाठी तुम्हाला Discord वर अकाऊंट तयार करावं लागतं. Discord एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्हाला सर्व बॉट्स मिळतात.

राणा डग्गुबती

Midjourney याच बॉट्सचा एक भाग आहे. AI वर आधारित या बॉट्सच्या आधारे तुम्ही काल्पनिक फोटो तयार करु शकता.

राम चरण

सुरुवातीला हे बॉट फ्री ट्रायल देत होते. पण आता त्यासाठी पैसे आकारले जात आहेत. यासाठी महिन्याला 10 ते 30 डॉलर्स आकारले जातात.

VIEW ALL

Read Next Story