अनिल कपूरच्या फिटनेसचं रहस्य काय? लेकीने केला खुलासा

Saurabh Talekar
Feb 25,2024

अनिल कपूर

बॉलिवूड स्टार अनिल कपूर नेहमी त्यांच्या फिटनेसमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. 67 च्या वयात देखील अनिल कपूर तिशीतले तरुण वाटतात.

अॅनिमल

अनिल कपूर नुकतेच अॅनिमल सिनेमामध्ये झळकले होते. त्यात त्यांनी रणबीरच्या वडिलांचा रोल केला होता.

फिटनेसचं रहस्य

मात्र, त्यामध्ये देखील अनिल कपूर यांचं वय दिसून आलं नाही. त्यामुळे अनिल कपूर यांच्या फिटनेसचं रहस्य काय? असा सवाल विचारला जातोय.

सोनम कपूर

अनिल कपूरच्या फिटनेसवर अनेक तर्क वितर्क काढले जातात. मात्र, त्यांची लेक सोनम कपूरने याबाबत खुलासा केला आहे.

ना दारु ना सिगारेट

माझे वडील दारू पीत नाहीत, सिगारेटही पीत नाहीत. यामुळेच ते इतके फिट आणि देखणा दिसतात.

आहाराची काळजी

अनिल कपूर दारू आणि सिगारेटपासून दूरच राहत नाही तर त्याच्या आहाराचीही विशेष काळजी घेतात.

चिटिंग नाही

सोनम सांगते, माझी आई सुनीता नेहमीच वडिलांच्या आरोग्याबाबत खूप जागरूक असते. त्यांना ती चिटिंग करून देत नाही.

माझी आई...

माझी आई अगदी एका भारतीय स्त्रीसारखी आहे, जी त्याच्या आहाराची अत्यंत काळजी घेते, असा खुलासा सोनम कपूरने केला होता.

VIEW ALL

Read Next Story