साउथच्या 'या' सुपरस्टार्सनी नाकारला होता शाहरुखचा 'जवान'; आता होतोय पश्चात्ताप!

शाहरुख खानचा 'जवान' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. फर्स्ट डे फर्स्ट शोलाच या चित्रपटाने तगडी कमाई केली आहे.

ओपनिंगलाच या चित्रपटाने 75 कोटींची कमाई केली आहे. तर, दुसऱ्या दिवशीही जवानचा जलवा कायम आहे

जवानचा सेकेंड डे कलेक्शन 50 कोटी इतकी होतं. किंग खानचा या चित्रपटाने बंपर कमाई केली आहे.

पण तुम्हाला माहितीये का, साउथच्या सुपरस्टार कलाकारांनी जवान चित्रपट नाकारला होता. आज जवानचे यश पाहता त्यांना नक्कीच पश्चात्ताप होत असेल.

जवान चित्रपटात शाहरुखसोबतच अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपतीदेखील आहेत. तर दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.

जवान चित्रपट याआधी साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जूनला ऑफर करण्यात आली होती. मात्र, अल्लूकडून काहीच प्रतिसाद आला नव्हता.

अल्लू अर्जूनबरोबरच समंथालादेखील जवान चित्रपटाबाबत विचारणा झाली होती. मात्र समंथाने तेव्हा चित्रपट नाकारला होता.

VIEW ALL

Read Next Story