अखेर SRK ने 3 गोष्टींचा उल्लेख करत सांगितलं हेअरकेअर सिक्रेट; घरच्याघरी तुम्हालाही सहज शक्य

स्टाइल स्टेटमेंट हीच ओळख

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख त्याच्या स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखला जातो.

तो करतो ती स्टाइल

कपड्यांपासून हेअरस्टाइलपर्यंत शाहरुख जे करतो ती स्टाइल होऊ जाते अशी स्थिती आजही आहे.

#AskSRK दरम्यान केला खुलासा

जबरदस्त फॅशन सेन्स असलेला शाहरुख त्याच्या केसांसाठी करतो तरी काय असा प्रश्न एका चाहत्याला पडला आणि त्याने तो एक्सवरील (ट्वीटरवरील) #AskSRK दरम्यान शाहरुखला विचारला.

अनेकदा टाळलं उत्तर

शाहरुखला अनेकदा त्याच्या केसांसाठी तसेच हेअरस्टाइलसाठी तो काय करतो हे विचारण्यात आलं आहे. पण तो दरवेळेस उत्तर टाळायचा. यंदा मात्र त्याने 3 गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला आहे.

प्रश्न काय होता?

"आपके बिखरे बिखरे बालों का राज?" असा प्रश्न चाहत्याने विचारला असता शाहरुखने खरोखरच त्याचं उत्तर दिलं.

उत्तर देताना शाहरुख काय म्हणाला?

शाहरुखने या प्रश्नाला उत्तर देताना, "(केसांना) आमला, ब्रृंगराज आणि मेथी लावतो," असं म्हटलं.

अनेक शतकांपासून होतोय याचा वापर

शाहरुखने ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या अनेक शतकांपासून आयुर्वेदामध्ये उत्तम केसांसाठी वापरण्याचा सल्ला दिला जातो. या वस्तूंमुळे केसांची वाढ अधिक उत्तमप्रकारे आणि सुदृढ होते.

हेअरस्टाइलनेही लक्ष वेधलं

शाहरुख खानच्या 'छय्या छय्या' किंवा 'गोरी गोरी' या गाण्यामध्ये त्याच्या डान्सबरोबरच हेअरस्टाइलनेही लक्ष वेधलं होतं.

लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला

शाहरुख आता डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या 'डंकी' चित्रपटामधून चाहत्यांच्या भेटीस येत आहे. 'जवान', 'पठाण'नंतर शाहरुखचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट असेल.

VIEW ALL

Read Next Story