खलनायक फेम संजय दत्तला दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हती

Jul 28,2023

खलनायकमुळे मिळाली मोठी पसंती

'हां.. मैं हूं खलनायक' हा डायलॉग येताच थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. खलनायकने संजय दत्तला मोठी पसंती मिळाली आणि मोठा चाहता वर्ग मिळाला

संजय दत्तला नव्हती पहिली पसंती

खलनायकसाठी संजयला सुभाष घई यांची पहिली पसंती नव्हती. त्यांना हा चित्रपट आमिर खानसोबत करायचा होता. पण तसे झालं नाही.

म्हणून आमिरने नाकारली भूमिका

आमिरला त्यावेळी कोणतीही नकारात्मक भूमिका करायची नव्हती त्यामुळे त्याला चित्रपटाला नकार दिला.

नाना पाटेकर यांना मिळाली संधी

त्यानंतर सुभाष घई यांनी नाना पाटेकर यांना या चित्रपटासाठी फायनल केले. त्यावेळी नाना पाटेकर यांना पसंती होती.

नानांनी लिहीली खलनायकची स्क्रिप्ट

सुभाष घई यांनी नाना पाटेकर यांना फायनल केले आणि चित्रपटाची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली. पण जसजशी स्क्रिप्ट फायनल झाली तसतसे सुभाष घई यांना वाटले की नाना हा चित्रपटासाठी योग्य पर्याय नाही.

असा मिळाला संजय दत्तला चित्रपट

त्यानंतर सुभाष घई यांच्या मनात संजय दत्तचा विचार आला. त्यानंतर सुभाष घई स्क्रिप्ट घेऊन संजय दत्तपर्यंत पोहोचले. संजय दत्तने या चित्रपटासाठी संमती दिली आणि बॉलिवूडला आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट मिळाला.

अनिल कपूर यांची हुकली संधी

अनिल कपूरला या चित्रपटात ही भूमिका करायची होती. पण अनिलच्या आधीच संजय दत्तने या चित्रपटासाठी होकार दिला होता. अशा परिस्थितीत सुभाष घई यांनी संजयसोबत हा आयकॉनिक चित्रपट केला. (सर्व फोटो - reuters)

VIEW ALL

Read Next Story