NCB अधिकारी अन् अभिनेत्रीचं कसं जमलं?

समीर वानखेडेंनीच सांगितला किस्सा

Aug 07,2023

समीर वानखेडे

डॉशिंग अधिकारी म्हणून आजही समीर वानखेडे यांचं नाव घेतलं जातं. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांची खूप चर्चा झाली.

क्रांती रेडकर

समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आपल्या नवऱ्याची बाजू भक्कमपणे मांडली होती. त्यामुळे हे कपल चांगलंच चर्चेत होतं.

गुप्ते तिथे खुप्ते

नुकतंच समीर वानखेडे यांनी गुप्ते तिथे खुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरं दिली.

तुमचं कसं जमलं?

तुम्ही एनसीबी अधिकारी अन् क्रांती अभिनेत्री, मग तुमचं कसं जमलं? असा सवाल अवधुत गुप्ते यांनी केला. त्यावर वानखेडे यांनी स्पष्ट उत्तर दिलं.

चित्रपट कलाकार

समीर वानखेडे अमूक-तमूक लोकांना पकडतात आणि त्यांची पत्नी चित्रपट कलाकार आहे, अशी माझ्यावर टीका केली जाते.

माझी जुनी मैत्रीण

लोक माझ्यावर टीका असतात. लोकांना माहीत नाही की ती माझी जुनी मैत्रीण आहे. आम्ही रुईया कॉलेजमध्ये एकत्र होतो, असं वानखेडे सांगतात.

मी तिला आवडायचो

कॉलेजपासून मी तिला आवडायचो, नंतर आम्ही लग्न केलं होतं, असं समीर यांनी सांगितलं. त्यावेळी अवधुत गुप्ते यांनी गुगली टाकली.

प्रपोज केलं नाही का?

तुम्ही कॉलेजमध्ये तिला प्रपोज केलं नाही का? असं बाऊंसर प्रश्न त्यांनी विचारला. इगो इश्यूज असतात ना, त्यामुळे मी अप्रोच केलं नाही. पण मलाही ती आवडायची, असा खुलासा त्यांनी केला.

क्रांतीने पुढाकार घेतला

मी बोलत नव्हतो, त्यामुळे तिनेच मला विचारलं. मलाही तिच्याशी लग्न करायचं होतं, असंही वानखेडे सांगतात.

VIEW ALL

Read Next Story