विशेष म्हणजे तिने ‘हंड्रेड’ या वेबसीरिजमध्येही काम केले होते. यात ती बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताबरोबर काम केलं आहे.

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने ‘सैराट’ चित्रपटानंतर ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

या फोटोंना कॅप्शन देताना रिंकूने ‘What Time Is It? Summer Time!’ असे म्हटले आहे.

तर त्यासोबत तिने प्रिंटेड कॉटन स्कर्ट घातला आहे.

या फोटोत रिंकूने पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस टॉप परिधान केला आहे.

आता रिंकूने 'समर स्पेशल' फोटोशूट केले आहे.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन 8 वर्ष उलटली असली तरी रिंकूला ‘आर्ची’ या नावाने ओळखले जाते.

दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा सैराट हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटामुळे मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु ही लोकप्रिय झाली.

VIEW ALL

Read Next Story