मात्र तरीही हिंदी सिनेसृष्टीतील बरेच कलाकार याच्या जाहिराती करतात.
मात्र तरीही हिंदी सिनेसृष्टीतील बरेच कलाकार याच्या जाहिराती करतात.
पान मसाला, गुटखा आणि दारुच्या जाहिरातींवरुन बॉलीवूडचे कलाकारांना सोशल मीडियावर कायमच ट्रोल केलं जातं.
मीम्सच्या माध्यमातून या बॉलीवूड कलाकारांना कायमच या सगळ्यावरुन ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
मात्र साऊथ सिनेविश्वातील कलाकार या सगळ्याला अपवाद आहेत.
साऊथमधील अभिनेते दारु , गुटखा किंवा सिगरेटच्या जाहिराती करत नाही.
मीडियारिपोर्टनुसार, अल्लू अर्जुन आणि यश यांनी अशा करोडो रुपयांच्या जाहिरातींना नकार दिल्याचं सांगितलं जातं.
साऊथचा अभिनेता सिद्धार्थ म्हणतो की, कोणतेही साऊथचे कलाकार अशा चुकीच्या पदार्थांच्या जाहिराती करत नाही.
सिद्धार्थने एका मुलाखतीत असं सांगितलं की, साऊथचे कलाकार रजनीकांत आणि कमल हसन यांचा खूप आदर करतात.
जेव्हा दोन्ही कलाकारांनी पान मसाला, दारु आणि गुटखा यांच्या जाहिराती न करण्याचा निर्णय घेतला त्यानंर साऊथचे कोणतेही कलाकार या जाहिराती करत नाही.