वाचनाचं वेड असणाऱ्या, नसणाऱ्या प्रत्येकानंच वाचावीत पुलंची 'ही' 5 पुस्तकं...

Jul 03,2024

पुलदैवत

ज्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाचं कुलदैवत असतं, त्याचप्रमाणं वाचनाची अमाप आवड असणाऱ्यांसाठी असतं, 'पुलदैवत'. अर्थात अनेकांचेच लाडके, पुलं.

खास पुस्तकांची नावं

मनातल्या भावना अचूक टीपत त्यातून वाचकांना हसवण्यापासून त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावण्यापर्यंतचं कमाल लेखन पुलंनी केलं आणि अनेक पिढ्यांना समृद्ध केलं. पुलंच्या अशाच काही खास पुस्तकांची नावं पाहा आणि ही पुस्तकं नक्की वाचा...

अपूर्वाई

पूर्वरंग, वंगचित्र आणि अपूर्वाई ही पुलंची काही प्रवासवर्णनं. प्रवासवेडे पुलं इथं सर्वांना भेटतात.

व्यक्ती आणि वल्ली

जीवनात भेटलेल्या व्यक्ती आणि त्यांचे कमाल अनुभव पुलंनी 'व्यक्ती आणि वल्ली'मधून मांडले.

रसिकहो

पुलंनी अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली आणि सामाजिक भानही जपलं. त्यांच्या काही भाषणांचे सुरेख नमुने 'रसिकहो'मध्ये देण्यात आले आहेत.

बटाट्याची चाळ

चाळीच्या साचेबद्ध प्रतिमेला शह देत एक वेगळंच चित्र 'बटाट्याची चाळ' मध्ये पाहायला मिळतं.

एक शून्य मी

पुलं आणि विनोद या समीकरणाला छेद देणारं पुस्तक म्हणजे, 'एक शून्य मी'

VIEW ALL

Read Next Story