सिटाडेल

प्रियांका सध्या तिच्या सिटाडेल या वेब सीरिजमध्ये दिसत आहे. कालची ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आहे. (All Photo Credit : Priyanka Chopra Instagram)

पारंपरिक कुटुंबातून असल्याचं मित्रांना समजावलं

प्रियांकानं त्यानंतर तिची ओळख बदलत त्या लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिनं तिच्या मित्रांना ती पारंपरिक कुटुंबातून असल्यानं तिला डेट करण्यासाठी किंवा मग एक रात्र बाहेर जाण्यासाठी परवानगी का दिली जात नाही, याविषयी सांगितले.

भारतीय आणि नॉन अमेरिकन असल्याची भीती

प्रियांका भारतीय किंवा मग नॉन अमेरिकन आहे म्हणून तिथले लोक तिला स्वीकारणार नाही याची भीती तिला सतावायची.

दुसरे मुल भेटायला नको म्हणून करायची हे काम

तिच्यासोबतच्या दुसऱ्या मुलांना भेटायला नको म्हणून प्रियांका वेंडिंग मशीनमधून चिप्सचे पॅकेड घ्यायची आणि पटपट बाथरूममध्ये जाऊन खायची. त्यानंतर परत वर्गात जाऊन बसायची, यामुळे तिला इतर मुलांना भेटायची गरज नव्हती.

बाथरुममध्ये करायची दुपारचं जेवण

प्रियांकानं खुलासा केला की सुरुवातीचे दिवस ती बाथरुममध्ये जाऊन दुपारचं जेवण करायची. कॅफेटेरियात कसं जायचं आणि कसं तिथून जेवण घ्यायचं हे तिला माहित नव्हते. त्यामुळे ती जवळच्या स्टॉलवरून जेवण घ्यायची आणि बाथरुममध्ये गपचूप खायची.

प्रियांकाचे सुरुवातीचे दिवस होते कठीण

प्रियांका इतकी घाबरली होती की तिचे सुरुवातीचे दिवस फार कठीण झाले होते. तिथल्या लोकांमध्ये मिसळण्यास प्रियांकाला खूप वेळ लागला. आत्मविश्वास, भीती आणि एकटेपणा अशा अनेक गोष्टींचा सामना केला.

शिक्षणासाठी गेली होती अमेरिकेत

प्रियांकानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की ती शिक्षणासाठी पहिल्यांदा ती अमेरिकेला गेली होती. तेव्हा ती खूप घाबरली होती.

VIEW ALL

Read Next Story