तुम्हाला माहितीये का, यंदाच्या म्हणजेच 2023 या वर्षातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण आहे?
दीपिका पदुकोण एका चित्रपटासाठी साधारण 15 ते 30 कोटी रुपये इतकं मानधन घेते.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणींच्या फेऱ्यात येणारी अभिनेत्री कंगना रणौत एका चित्रपटासाठी साधारण 27 कोटी रुपये इतकं मानधन आकारते.
आयएमडीबीच्या माहितीनुसार अभिनेत्री कतरिना कैफ एका चित्रपटासाठी 15 ते 21 कोटी रुपये इतकं मानधन घेते.
अल्पावधीतच लोकप्रिय झालेली आलिया भट्ट प्रत्येक चित्रपटासाठी साधारण 10 ते 20 कोटी रुपयांचं मानधन घेते.
अभिनेत्री अनुष्का शर्मा एका चित्रपटाच्या मागे 8 ते 12 कोटी रुपये इतकं मानधन घेते.
हिंदी चित्रपट विश्वातील सौंदर्यवती, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन साधारण 10 कोटी रुपये एका भूमिकेसाठी आकारते.
दाक्षिणात्य अभिनेत्रींचं सांगावं तर, लेडी सुपरस्टार नयनतारा एका चित्रपटासाठी 2 ते 10 कोटी रुपये इतकं मानधन घेते.
समंथा रुथ प्रभूसुद्धा या यादीत असून, एका चित्रपटासाठीचं तिचं मानधन 3 ते 8 कोटी रुपयांच्या घरात असतं.
या सर्व अभिनेत्रींना मागे टाकत सर्वाधिक मानधन घेणारी भारतीय अभिनेत्री होण्याचा बहुमान जातो प्रियांका चोप्राकडे. IMDb च्या माहितीनुसार ती एका प्रोजेक्टसाठी साधारण 15 ते 40 कोटी रुपये इतकं घसघशीत मानधन घेते.