बोमन अन् बेलीचेही आभार

गोंजाल्विस यांनी, "अकादमीने आमच्या प्रयत्नांचं कौतुक केलं, मूळ निवासी आणि प्राण्यांच्या विषयाकडे लक्ष वेधलं यासाठी त्यांचे आभार. नेटफ्लिक्सने आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाठी त्यांचेही आभार. आमच्या निर्मात्या गुनीत आणि माझ्याबरोबर आदिवासींच्या संकल्पना समजून सांगण्याऱ्या बोमन आणि बेली यांचेही आभार," असंही म्हटलं.

निर्मात्यांचे आभार

कार्तिकी गोंजाल्विस यांनी निर्मत्या गुनित मोंगा यांचेही आभार मानले.

दिग्दर्शिकेने मानले यांचे आभार

कार्तिकी गोंजाल्विस यांनी पुरस्कार स्वीकारताना, "मी आज इथे मानव आणि प्रकृतीमधील पवित्र बंधन, मूळ निवासी असलेल्या लोकांच्या सन्मानार्थ आणि अन्य प्राण्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करते. मी आपल्या सर्वांचं लक्ष या विषयाकडे वेधू इच्छिते," असं म्हटलं.

मी अनेक हत्तींची घेतली काळजी

"मी अशा अनेक लहान हत्तींची माझ्या मुलांप्रमाणे काळजी घेतली आहे. मी आईप्रमाणे त्यांची काळजी घेतली आहे. खास करुन ज्या हत्तींच्या मातेचा जंगलात मृत्यू होतो त्यांना मी फार प्रेमाने मोठं केलं आहे," असं बेल्ली सांगतात.

शुभेच्छांचा आनंद

आपल्याला पुरस्कारासंदर्भात ठाऊक नसलं तरी हा पुरस्कार मिळाल्यानंतर ज्या शुभेच्छा मिळत आहेत त्यामुळे फार आनंद होतोय, असंही बेल्ली यांनी सांगितलं.

मुलांप्रमाणे संभाळतो

"हत्ती आमच्या लहान मुलांसारखे आहेत. आम्ही आई नसलेल्या छोट्या अनाथ हत्तींचं संगोपन हे एक सेवा म्हणून पाहतो," असं बेल्ली यांनी म्हटलं आहे.

मला हत्तीची आई असल्याचा आनंद अधिक

या डॉक्युमेंट्रीच्या केंद्रस्थानी असलेल्या बेल्ली यांनी ऑस्कर जिंकल्यानंतर प्रतिक्रिया नोंदवताना, "मला ऑस्कर्सबद्दल ठाऊक नाही. मात्र मला तरुण हत्तीची 'वलारप्पु थाई' (पालक माता) म्हणून मिळालेली ओळख फार प्रिय आहे," असं म्हटलं.

यांना पराभूत करत मिळवला पुरस्कार

तमिळ भाषेत बनवण्यात आलेल्या ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीने 'हॉलआऊट', 'हाउ डू यू मेजरमेंट अ ईयर?', ‘द मार्था मिशेल इफेक्ट’ आणि ‘स्ट्रेंजर एट द गेट’ या डॉक्युमेंट्रीला मात देत पुरस्कार पटकावला.

प्राणी मानव नातेसंबंध

ही डॉक्युमेंट्री दोन छोटे हत्ती आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांमधील नातेसंबंधांच्या विषयावर आधारित आहे. 'सिख्या एंटरटेनमेंट'च्या मोंगा आणि अचिन जैन या डॉक्युमेंट्रीचे निर्माते आहेत.

रघुला पाहण्यासाठी गर्दी

या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर या छोट्या रघु हत्तीला पाहण्यासाठी आता थेप्पाकडू एलिफन्ट कॅम्पमध्ये पर्यटक गर्दी करत आहेत.

रघु हत्तीवरील डॉक्युमेंट्री

ही डॉक्युमेंट्री ज्या हत्तीवर चित्रित करण्यात आली आहे त्याचं नावं रघु असं आहे.

देशभरात जल्लोष

‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ने मिळवलेल्या या पुरस्काराचा भारतभरामध्ये जल्लोष साजरा केला जात आहे.

सर्वोत्तकृष्ट डॉक्युमेंट्री पुरस्कार

‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीने अकदामी पुरस्कार सोहळ्यात म्हणजेच ऑस्कर्स सोहळ्यामध्ये 'डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट' कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळवला आहे.

VIEW ALL

Read Next Story