आजही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींबद्दल बोलायचं झाल्यास ऐश्वर्या रायचं नाव आवर्जून घेतलं जातं.
अर्थात मागील काही वर्षांपासून ऐश्वर्या अगदीच मोजक्याच चित्रपटांमधून चाहत्यांच्या भेटीस आली आहे.
ऐश्वर्या शेवटची 'पीएस-2' चित्रपटामध्ये दिसली होती.
दरवर्षी ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टीव्हलच्या रेड कार्पेटवर दिसते.
सासरच्या लोकांची संपत्ती वगळली तरी ऐश्वर्या राय ही चित्रपटांपासून दूर असूनही बी-टाऊनमधल्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे.
ऐश्वर्याची एकूण संपत्ती ही 776 कोटी रुपये इतकी आहे. पण तिच्या या संपत्तीमध्ये नेमका कसला समावेश होतो पाहूयात...
ऐश्वर्याच्या संपूर्ण करिअरचा विचार केल्यास तिच्या आर्थिक कमाईचा सर्वात महत्त्वाचा वाटा हा चित्रपटांचा आहे.
ऐश्वर्या मागील 2 दशकांपासून चित्रपटांमध्ये काम करत असून ती प्रत्येक चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी मानधन घेते.
ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन हे दोघे लग्नानंतरही पालक अमिताभ बच्चन-जया बच्चन यांच्याबरोबर 'जलसा' या निवासस्थानी राहतात.
पण ऐश्वर्या आणि अभिषेकने दुबईमधील 'जुमैर गोल्फ इस्टेट'मध्ये आलिशान बंगला घेतला आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेकच्या दुबईतील या बंगल्याची किंमत 15 कोटी रुपयांहून अधिक आहे.
संपत्तीचा विचार केल्यास ऐश्वर्या अन् अभिषेकच्या नावावर मुंबईत एक 21 कोटींचा फ्लॅटही आहे.
ब्रॅण्ड एण्डोर्समेंट हा सुद्धा ऐश्वर्याच्या कमाईचा प्रमुख स्त्रोत आहे.
'लॉरीएल'सारख्या मोठा ब्रॅण्ड ऐश्वर्यामुळे ओळखला जातो.
एका वृत्तानुसार दरवर्षी ऐश्वर्याला जाहिरातीसंदर्भातील करारामधून 80 ते 90 कोटी रुपये मिळतात.
जाहिरातीच्या शूटसाठी किंवा ब्रण्डींगसंदर्भातील कार्यक्रमांसाठी ऐश्वर्या एका दिवसाला 6 ते 7 कोटी रुपये मानधन आकारते.
अभिनेत्री ऐश्वर्या राय ही रोल्स रॉयस कारची मालकीण आहे. तिच्याकडे रोल्स रॉयस घोस्ट ही 7.95 कोटींची कार आहे.
याशिवाय ऐश्वर्याकडे मर्सिडीज बेन्स एस 350 डी क्यूप ही 1.60 कोटींची कार आहे.
तसेच ऑडी ए 8 एल ही 1.58 कोटींची तसेच लेक्सस एलएक्स 570 आणि मर्सिडीज बेन्स एस 500 ही ऐश्वर्याकडे आहे.