ग्रामीण जीवनशैलीवर आधारित पंचायत ही वेबसिरीज चांगलीत गाजली होती. पंचायतच्या तिसऱ्या भागाला देखील नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलंय.
मात्र, पंचायत सिरीज शाहरुख खानच्या 1989 च्या उमीद या सिनेमासारखीच असल्याचं नेटकऱ्यांच्या निदर्शनास आलंय. त्यातील काही गोष्टी तंतोतंत जुळल्या आहेत.
दोन्हींमध्ये अनेक साम्य दिसतं. जसं की दोघंही मोठ्या शहरातून गावात जॉबसाठी येतात आणि स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात.
उमीदमध्ये जेव्हा शाहरूख पोहोचतो तेव्हा ऑफिसला कुलूप लावलेलं असतं तसंच पंचायतमध्ये देखील दाखवण्यात आलंय.
तर उमीदमध्ये शाहरूखला असिस्टंट म्हणून भुरे खान असतो, तर पंचायतमध्ये सचिवजींच्या साथीला विकास असिस्टंट म्हणून असतो.
शाहरूख ऑफिसमध्येच आपलं बस्तान बांधतो, तर पंचायतमध्ये सुद्धा सचिवजी ऑफिसमध्येच आपलं घर बसवतात.
उमीदमध्ये शाहरूख खान नदीत अंघोळीला जाताना दिखवलाय. तर पंचायतमध्ये हापसा दाखवण्यात आलाय.