सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अल्पावधीतच मोठी कमाई केली आहे.
त्यातून यावर्षी हा चित्रपट सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं फार 500 कोटीच्या वर अल्पावधीतच कमाई केली आहे.
दिग्दर्शक अनिल शर्मा यांची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी त्यांनी अनेक मुलाखती दिल्या आहेत.
सध्या त्यांनी नसिरूद्दीन शहांबद्दलची एक आठवण सांगितली आहे. 'बॉलिवूड ठिकाणा'ला दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी ही माहिती दिली आहे.
नसीरुद्दीन शाह, जावेद जाफरी, आदित्य पंचोली यांचा 1992 साली आलेला 'तेहेलका' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यावेळचे ही आठवण आहे.
जेव्हा अनिल शर्मा यांनी नसिरूद्दीन शहा यांनी बिकीनी परिधान करण्यास भाग पाडले होते. जावेद जाफरी, आदित्य पंचोली यांनीही बिकीनी परिधान केली होती.
ते म्हणाले की, ''यांना सांगितली तेव्हा ते मस्करीत मला म्हणाले की, तू जर मला फाटके कपडे दिले असतेस तर मी तुला सवाल केला असता''
नसिरूद्दीन शहा त्यांनी पुढे म्हणाले की, ''तू तर मला बिकिनी परिधान करायला देत आहेस तर मी कशाला सवाल करू? दिग्दर्शकाला जे हवं आहे ते देणं अभिनेत्याचं काम आहे. खऱ्या आयुष्यात थोडीच मी असा वावरणार आहे.''