काल 10 डिसेंबर रोजी मुक्ती आणि कुणाल लग्न बंधनात अडकले.
मुक्तिनं लाल, बेज आणि पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला असून ती खूप सुंदर दिसत आहे.
कुणालनं क्रीम आणि लाल रंगाची एथनिक शेरवानी परिधान केली आहे.
या लग्नसोहळ्यातील एक फोटो हा संपूर्ण कुटुंबासोबतचा आहे. यात मोहन आणि ठाकुर कुटूंब एकत्र दिसत आहे.
या निमित्तानं मुक्ति आणि कुणालला अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात विजय वर्मा, ऋचा शर्मा, आयुष्मान खुराना, नकुल मेहता, गौहर खान, मौनी रॉय, आणि तृप्तिनं मुक्ति-कुणालला शुभेच्छा दिल्या आहेत.
नीति मोहन, शक्ती मोहन आणि मुक्ति मोहन या तिघी मिळून कॉन्सर्ट करत असल्याचे पाहायला मिळते. त्या तिघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते हे आतुरच असतात. (All Photo Credit : Mukti Mohan Instagram)