'रंग बसंती' या हिंदी चित्रपटातली ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांच्या आईची भुमिका खूप गाजली. स्वर्गीय लता मंगेशकर यांनी गायलेले 'लुका छुपी' हे त्यांच्यावर आई-मुलाचे प्रेम दर्शवणारे गाणे प्रचंड गाजले.
'नीरजा' या 2016 साली आलेल्या चित्रपटातून शबाना आझमी यांनी हवाईसुंदरी नीरजा भनोट यांच्या आईची भुमिका केली होती. आई आणि मुलीच्या कथेवर आधारित ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
'इंग्लिश विग्लिंश' आणि 'मॉम' या दोन चित्रपटांतून ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांनी साकारलेली आईची भुमिका प्रचंड गाजली होती. यातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.
'कहानी' या चित्रपटातून गरोदर महिलेची भुमिका साकारणाऱ्या विद्या बालनचे कौतुक झाले होते. त्याचसोबत 'पा' या चित्रपटातूनही साकारेलल्या ऑरोच्या आईची भुमिकाही प्रचंड गाजली होती.
'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील जया बच्चन यांची भुमिका विशेष गाजली.
किरण खेर यांनी 'ओम शांती ओम', 'सिंग इज किंग', 'दोस्ताना' सारख्या चित्रपटातून केलेल्या भुमिका विशेष गाजल्या होत्या
रिमा लागू यांनी 'वास्तव' या चित्रपटातून साकारलेली भुमिका ही अत्यंत गाजली होती.
राखी यांनी 'करन अर्जुन' चित्रपटात साकारलेली आईची भुमिका अत्यंत गाजली. 'मेरे करन-अर्जुन आयेंगे' हा त्यांच्या डायलॉगही खूप गाजला.
'मदर इंडिया' या चित्रपटातील मदर इंडियाची भुमिका प्रचंड गाजली होती.