"त्यांच्या Insecurity मुळं माझ्या सीनवर कात्री.", Scoop फेम Zeeshan Ayyub नं थेट मुद्द्याला घातला हात

Diksha Patil
Jun 28,2023

जीशाननं 'स्कुप'साठी ओळखतात

जीशानला सध्या अनेक लोक 'स्कुप' या वेब सीरिजमुळे ओळखतात.

बऱ्याचवेळा काम मिळत नाही, जीशानचा खुलासा

जीशाननं सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत काम देणार असे वचन दिल्यानंतर काम दिले जात नाही किंवा त्यांचे महत्त्वाचे सीन्स कट करण्यात येतात.

जीशानप्रमाणे अरशद वारसीनं देखील केले होते आरोप

जीशान आधी अभिनेता अरशद वारसीनं देखील असे आरोप केले होते की सहकलाकाराला असुरक्षित वाटल्यावर त्याचे सीन्स कट करण्यात येतात.

सीन्स कट केल्यानंतर खूप वाईटतं ते सांगत जीशान म्हणाला...

जीशान म्हणाला, "हे माझ्यासोबत झालं आहे आणि अनेकवेळा घडलं आहे. त्यावर काही तरी करायला हवं असा विचार आला आहे. कारण आम्ही सेटवर जे काही करतो ते स्क्रिप्टच्या हिशोबानं करतो. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही अभिनय करतो तेव्हा सगळंच बदललेले असते."

स्क्रिनिंगच्या वेळी कळतं की आपले चांगले डायलॉग्स काढून टाकले

जीशान म्हणाला की "बऱ्याचवेळा स्क्रिनिंगच्या वेळी कळतं की जिथे माझे डायलॉग्स हे दमदार होते ते काढून टाकले आहेत. कारण इतर कलाकारांना असुरक्षित वाटतं म्हणून. हे अनेकवेळा घडलं आणि आता त्याची मला सवय आहे. पण प्रत्येकवेळी तितकंच वाईट वाटतं."

पुढच्या प्रोजेक्टविषयी जीशाननं घेतला 'हा' निर्णय

आगामी प्रोजेक्टसाठी निर्मात्यांना हे सांगितलं आहे की "त्याचं त्यात महत्त्व असेल. असं केलं तरच त्याला त्याच्या भूमिके चांगल्या प्रकारे दाखवता येतील असं त्याला वाटतं."

स्कुपमध्ये जीशानसोबत त्याच्या पत्नीनं देखील केलं काम?

जीशानसोबत त्याची पत्नी रसिका आगाशेनं देखील या सीरिजमध्ये काम केलं आहे. जीशाननं एडिटर इमरान सिद्दीकीची भूमिका साकारली तर रसिका आगाशेनं मॅट्रन मीना राणे हे भूमिका साकारली आहे.

जीशान आणि रसिकानं पहिल्यांदा केलं एकत्र काम!

रसिकानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत पहिल्यांदा एकत्र काम केल्याचा खुलासा केला. इतकंच काय तर हंसल मेहता यांचे यासाठी आभार मानले.

जीशान आणि रसिकानं थिएटरमधून केली करिअरची सुरुवात

जीशान आणि रसिकानं थिएटरमधून करिअरची सुरुवात केली असून 2007 साली लग्न बंधनात अडकले. त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. (All Photo Credit : Mohd Zeeshan Ayyub Instagram)

VIEW ALL

Read Next Story