अभिनयपासून, राजकारण कसा आहे मिमी चक्रवर्ती यांचा प्रवास?

मिमी चक्रवर्ती

बंगाली चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1989 रोजी झाला आहे. आज त्यांचा 35 वा वाढदिवस आहे.

कुठल्या आहेत मिमी चक्रवर्ती?

मिमी चक्रवर्ती या पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी शहरातील आहेत.

अरुणाचलमध्ये गेलं बालपण

मिमी यांचं बालपण हे अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यातील देवमाली शहरात झालं. त्यानंतर त्या कुटुंबासोबत पुन्हा जलपाईगुडी येथे आल्या आणि पुढचं शिक्षण पूर्ण केलं.

कोलकातामध्ये घेतलं शिक्षण

मिमी यांनी त्यांचं पुढचं शिक्षण हे कोलकातामधील आशुतोष कॉलेजमध्ये घेतलं.

करिअरची सुरुवात

मिमी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही एक मॉडेल म्हणून केली. त्यासोबतच त्या फेमिना मिस इंडिया कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्याशिवाय 'चॅम्पियन' या मालिकेतून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

पहिला चित्रपट

मिमी यांचा पहिला चित्रपट 'बापी बारी' असून तो 7 डिसेंबर 2012 रोजी प्रदर्शित झाला.

राजकारणात पदार्पण

मिमी यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढत राजकारणात पदार्पण केलं. त्यांनी टीएमसी पक्षातून जाधवपुर लोकसभा निवडणूक लढवली आणि इतकंच नाही तर भाजपाच्या अनुपम हाजरा यांना तीन लाख मतांनी पराभूत केलं. (All Photo Credit : Mimi Chakraborty Instagram)

VIEW ALL

Read Next Story