झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत बालकलाकार म्हणून मायरा वायकुळ घराघरात लोकप्रिय आहे.
मायराने या मालिकेत परी हे पात्र साकारले होते. तिने तिच्या निरागस अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकली.
सध्या मायरा ही तिच्या कुटुंबाबरोबर काश्मीर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
याचे काही खास फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
मायरा ही सध्या काश्मीरच्या गुलमर्गमध्ये बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसत आहे.
यावेळी ती टोपी, गमबूट, स्वेटशर्ट अशा लूकमध्ये दिसत आहे.
मायराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती काही महिन्यांपूर्वी ‘नीरजा: एक नयी पहचान’ या हिंदी मालिकेत झळकली होती.
त्यासोबतच आता लवकरच मायरा हिरण्यगर्भ मनोरंजन निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटात दिसणार आहे.