मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही कायमच प्रसिद्धीझोतात असते.

'नटरंग' चित्रपटातील 'अप्सरा आली' या गाण्यामुळे ती घराघरात पोहोचली.

सोनालीने तिच्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते.

तिने 'हिरकणी', 'मितवा', 'धुरळा', 'तमाशा लाईव्ह' यांसारख्या अनेक चित्रपटांमधून काम करत रसिकांची मनं जिंकली आहेत.

आता सोनाली कुलकर्णीने खास फोटो पोस्ट केले आहेत.

यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे.

सोनालीने हे फोटो पुण्यात वादळ येण्यापूर्वी काढले होते.

या फोटोला कॅप्शन देताना तिने "Did this छायाचित्रण just before वादळ hit #pune म्हणून हे गाणं….. #latepost अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा", असे म्हटले आहे.

VIEW ALL

Read Next Story