कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिवानी सोनारने साखरपुडा केला आहे.


शिवानीने 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेता अंबर गणपुलेशी गुपचूप साखरपुडा उरकला. आता त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत.


शिवानी आणि अंबरने काल म्हणजे 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा केला. यामुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला.


शिवानी आणि अंबरच्या साखरपुड्याला कुटुंबीय आणि जवळचे मित्र-मंडळी उपस्थित होती.


यावेळी शिवानीच्या बोटात सिंगल डायमंड आणि बाजूला छोट्या डायमंडची नक्षी असलेल्या अंगठीने सर्वांचेच लक्ष घेतले. तर अंबरच्या बोटात गोल्ड बँड पद्धतीची अंगठी पाहायला मिळाली.


यावेळी शिवानीने गोल्डन रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. त्याबरोबर तिने गळ्यात सुंदर नेकलेस आणि त्यावर साजेसा मेकअप केला होता.


तर अंबरने जांभळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. शिवानी आणि अंबरच्या लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे.


'अलेक्सा प्लीज प्ले, एक दिन आप यूं हमको मिल जायेंगे. #Ambani.' असे कॅप्शन शिवानीने या फोटोंना दिले आहे.


शिवानी ही सध्या 'सिंधुताई माझी माई' या मालिकेतून झळकत आहे. या मालिकेत तिने साकारलेली सिंधुताई सपकाळ यांची व्यक्तिरेखा सगळ्यांनाच पसंत पडली आहे.


तर अंबरने स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेत काम केलं होतं. त्यासोबतच तो झी मराठीवरील 'लोकमान्य' या मालिकेतही झळकला होता.

VIEW ALL

Read Next Story