मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच धुमधडाक्यात पार पडला. या सोहळ्याला अनेक मराठी आणि बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली.
या फिल्मफेअर सोहळ्यासाठी अभिनेत्री रिंकू राजगुरु खास लूक केला होता.
या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी तिने डीपनेक कलरफुल गाऊन परिधान केला होता.
त्यासोबत तिने डायमंड नेकलेस आणि त्यावर साजेसाचा मेकअपही केल्याचे पाहायला मिळाले.
रिंकूच्या या बोल्ड लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्यावेळी रिंकूने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचीही भेट घेतली. यावेळी तिने 'आवडता' असे कॅप्शन देत फोटो शेअर केला.
दरम्यान रिंकू राजगुरु ही 'सैराट' या चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली.
त्यानंतर तिने 'कागर', 'झुंड', 'मेकअप','आठवा रंग प्रेमाचा' झिम्मा अशा अनेक चित्रपटात काम केले. तसेच ती काही वेबसीरिजमध्येही झळकली.