असंख्य तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला मराठमोळा अभिनेता म्हणून सुयश टिळकला ओळखले जाते.

सुयश टिळकने 21 ऑक्टोबर 2021 रोजी अभिनेत्री आयुषी भावेबरोबर लग्नगाठ बांधली.

सुयश टिळकची पत्नी आयुषी ही एक उत्तम अभिनेत्री आणि डान्सर आहे.

आता सुयश टिळकची पत्नी आयुषीने ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.

यावेळी तिने निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर वनपीस परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.

यासोबतच तिने हटके मेकअप केला असून त्यासोबत साजेशी ज्वेलरी परिधान केली आहे.

"एका गोड सुटकेचे स्वप्न पाहत आहे", असे कॅप्शन तिने या फोटोशूटला दिले आहे.

आयुषीच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत ती छान दिसत असल्याचे म्हटले आहे.

VIEW ALL

Read Next Story