महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी ते अभिज्ञा भावे घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करणारे मराठी कलाकार

महेश मांजरेकर

महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता ही कॉस्च्युम डिझायनर होती. लग्नाच्या काही वर्षांनी ते विभक्त झाले. त्यानंतर महेश मांजरेकरांना मेधासोबत लग्न केलं.

शशांक केतकर

शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांची लव्ह स्टोरी मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान सुरु झाली. 2014 मध्ये लग्न झालं, मात्र त्यांचा संसार एकवर्षही टिकला नाही. त्यानंतर 2017 मध्ये शशांकनं प्रियंका ढवळेशी लग्न केलं.

रेशम टिपणीस

रेशम टिपणीसनं 1993 मध्ये अभिनेता संजीव सेठसोबत लग्न केले आणि 2014 मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर रेशमनं जवळचा मित्र संदेश कीर्तिकरसोबत लग्न केलं.

पियुष रानडे

पियुष रानडे यांनी 2010 मध्ये शाल्मली टोल्येशी लग्न केले, मात्र चार वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2017 मध्ये मयुरी वाघ यांच्याशी लग्न केलं.

मेघा धाडे

मेघा धाडे कमी वयात आणि लग्नाबाहेर गरोदर राहिली, फसवणूक होत असल्याचे कळताच तिनं मुलीला सिंगल मदर म्हणून मोठे केले. त्यानंतर तिनं आदित्य पावसकरशी लग्न केलं.

स्वप्नील जोशी

2005 मध्ये स्वप्नीलने अपर्णा नावाच्या डेंटिस्टशी लग्न केले, पण 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2011 मध्ये त्यानं डेंटिस्ट असणाऱ्या लीना आराध्येशी लग्न केलं.

गिरीश ओक

गिरीश ओक यांचे मैत्रिण पद्मश्री पाठक यांच्याशी लग्न झाले. पण काही कारणांमुळे त्यांचा घटस्फोट झाला. गिरीशने नंतर यांनी नंतर जवळची मैत्रीण पल्लवीशी लग्न केले.

शर्मिष्ठा राऊत

शर्मिष्ठाने तिचा जिवलग मित्र अमेय निपाणकर याच्याशी पहिले लग्न केले, पण दुर्दैवाने हे लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर शर्मिष्ठानं तेजस देसाईशी 2020 मध्ये लग्न केलं.

अभिज्ञा भावे

अभिज्ञा भावेने 2014 मध्ये वरुण वैतीकरसोबत लग्न केले परंतु 2016 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर 2021 मध्ये तिनं प्रियकर मेहुल पैसोबत लग्न केलं. (All Photo Credit : Respective Celebrities Instagram/ Social Media)

VIEW ALL

Read Next Story