जय (इमरान खान) आणि अदिती (जेनीलिया देशमुख) चांगले मित्र आहेत आणि ग्रुपमधल्या प्रत्येकाला वाटते की ते एकमेकांसाठी बनलेले आहेत. ते दोघ वेगवेगळ्या पार्टनर्स सोबत एकमेकांना सेट करण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांना हे जाणवते की ते एकमेकांवर खरोखर प्रेम करतात.
सिड (रणबीर कपूर), एक बिघडलेला मुलगा. आणि एके दिवशी तो आयशा (कोंकणा सेन शर्मा) नावाच्या मुलीला भेटतो, जिच्याशी त्याची मैत्री होते. त्यांच्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर होते.
हा चित्रपट 4 मित्र-मैत्रीणीचा आहे. त्यांचा कॉलेज ते लग्नापर्यंतचा प्रवास आहे. बनी (रणबीर कपूर) आणि नैना (दीपिका पदुकोण), जे पूर्वी फक्त मित्र होते. प्रवास आणि जीवनाच्या अनुभवातून त्यांचे प्रेम शोधतात.
ही स्टोरी आयशा (सोनम कपूर) बद्दल आहे. एक मॅचमेकर जिला कळते की ती तिच्या जिवलग मित्र अर्जुनच्या (अभय देओल) प्रेमात आहे.
या चित्रपटात राहुल (शाहरुख खान) आणि अंजली (काजोल) यांची स्टोरी दाखवण्यात आली आहे. तर काजोलच्या समरकॅम्पमध्ये शाहरुखची लेक अर्थात छोटी अंजली जाते आणि तिथे त्या दोघांना त्यांच्यात असलेल्या प्रेमाची जाणीव करुन देते.
बालपणीचे मित्र आलिया (दीपिका पदुकोण) आणि अभय (इमरान खान) त्यांच्या नात्यातील चढ-उतारांमधून जात असतात. ब्रेकअपनंतर त्यांच्या मनातील भावना जुळतात.
आकाश, समीर आणि सिद्धार्थ हे तिघ. बालपणीच्या अतूट मित्रांची ही स्टोरी आहे. तिघेही आयुष्य आणि प्रेमाच्या प्रवासाला लागतात. प्रेमावर अजिबात विश्वास नसलेला आकाश (आमिर खान) त्याची मैत्रिण शालिनी (प्रीती झिंटा) च्या प्रेमात पडतो.