7 कोटींसाठी KBC मध्ये विचारला 'हा' प्रश्न; तुम्हाला देता येईल का उत्तर?

15 वं पर्व प्रेक्षकांना आवडलं

'कौन बनेगा करोडपती'चं 15 वं पर्व सुरु झालं असून हे पर्वही अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं दिसत आहे.

पहिला करोडपती

पंजाबमधील जसकरन सिंग हा 'कौन बनेगा करोडपती'च्या 15 व्या सीझनचा पहिला करोडपती ठरला आहे.

पंजाबमधील रहिवाशी

15 व्या पर्वातील 17 व्या एपिसोडमध्ये 21 वर्षीय जसकरन सिंग सहभागी झाला होता. तो पंजाबमधील तरन तारन जिल्ह्यात राहतो.

आयपीएस होण्याची इच्छा

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या जसकरनने आपली आयपीएस होण्याची इच्छा असल्याचं सांगितलं.

1 कोटीचा प्रश्न काय होता?

एक कोटीसाठी जसकरनला 'भारताच्या राजधानीचं शहर कोलकात्यावरुन दिल्लीला स्थलांतरित करण्यात आलं तेव्हा भारताचे व्हॉइसरॉय कोण होते?' हा प्रश्न विचारण्यात आला.

1 कोटीच्या प्रश्नाचं उत्तर काय

या प्रश्नासाठी जसकरनला 4 पर्याय देण्यात आले होते. ज्या मध्ये लॉर्ड कर्जन, लॉर हार्डिंग, लॉर्ड मिंटो आणि लॉर्ड रीडिंग यांचा समावेश होता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर लॉर्ड हार्डिंग असं होतं.

खेळ सोडण्याचा निर्णय

यानंतर जसकरनला 7 कोटींचा प्रश्न विचारण्यात आला. त्याला या प्रश्नाचं उत्तर ठाऊक नव्हते. त्यामुळे त्या धोका पत्कारण्याऐवजी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

7 कोटींचा प्रश्न काय होता?

7 कोटींसाठी जसकरनला 'पद्म पुराणानुसार कोणत्या राजाला एका हरणाने दिलेल्या शापामुळे 100 वर्षांसाठी चित्ता म्हणून रहावं लागलं?' असा प्रश्न विचारण्यात आला होता.

7 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर काय?

या प्रश्नाचं उत्तर जसकरनला आलं नाही आणि त्याने खेळ सोडला. या 7 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर राजा प्रभंजन असं आहे.

VIEW ALL

Read Next Story