दिपिका पादुकोण आणि करिना कपूरसारख्या आघाडीच्या अभिनेत्री सध्या बॉलिवूडवर राज्य करत आहेत.
मागील काही काळापासून अभिनेत्यांइतकं महत्त्व अभिनेत्रींनाही प्राप्त झालं आहे. त्यामुळे त्यांनाही उत्तम भूमिका आणि मानधन दिलं जातंय.
मात्र दिपिका आणि करिना यांनी बॉलिवूडवर आपलं वर्चस्व निर्माण करण्याआधी 1990 च्या दशकामध्ये एका अभिनेत्रीने बॉलिवूड चाहत्यांना वेड लावलं होतं.
या अभिनेत्रीचं नाव आहे माधुरी दिक्षीत! 1984 साली 'अबोध' चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या माधुरीचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला.
मात्र माधुरी काम करत राहिली आणि हळूहळू तिने स्वत:ची जागा निर्माण केली. नृत्य कौशल्याच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात जागा मिळवली.
80 च्या दशकात 'तेजाब' वगळता सातत्याने अपयश आल्यानंतर 90 च्या दशकामध्ये माधुरीने 'दिल', 'बेटा', 'हम आपके हैं कौन..!' आणि 'दिल तो पागल है' सारखे सुपरहीट चित्रपट दिले.
90 च्या दशकामध्ये माधुरीची क्रेझ एवढी वाढली की तिला बुरखा परिधान करुन स्वत:चे चित्रपट पाहायला जावं लागायचं.
90 च्या दशकामध्ये एकेकाळी माधुरी ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती.
माधुरीची लोकप्रियता अगदी पाकिस्तानमध्येही होती. माधुरीची पाकिस्तानी लष्करी सैन्यामध्येही प्रचंड क्रेझ होती.
कारगील युद्धामध्ये पाकिस्तानी लष्कराने भारताचा ताब्यात घेतलेला प्रांत सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र एकच अट त्यांनी ठेवली होती. ती अट म्हणजे माधुरीने आमच्याबरोबर यावं!
माधुरीने 1999 साली डॉ. श्रीराम नेनेंबरोबर लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहे.
माधुरी मागील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये 'मज्जा मा' चित्रपटात झळकली होती.