'सून काही टाईमपास नाही, आणि माझ्या आईलाही याची गरज नाही''ट्रोल्सवर भडकला करण जोहर

करण जोहर भडकला

दिग्दर्शक करण जोहर 51 वर्षाचा आहे. दोन मुलांचा बाप असलेल्या करण जोहरने लग्न केलेलं नाही. त्याच्या घरी सून नाही कोणतीच सपोर्ट सिस्टम नाही. आई हीरू जोहर आणि करण जोहर मिळून मुलांच संगोपन करतात.

हल्लीच काही लोकांनी करण जोहरला वाईट पद्धतीने ट्रोल केलं. एका युझरने तर लिहिलं की, सून घेऊन ये, आईचा वेळ जात नसेल. करणला युझरची ही गोष्ट अजिबातच आवडली नाही.

करणने अजिबातच वेळ न घालवता ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं. दिग्दर्शक करण म्हणाला की, ही पोस्ट मी त्या सगळ्या क्रेझी ट्रोल्ससाठी पोस्ट करत आहे. जे माझ्या आयुष्यातील जॉइसेसला जज करत आहेत, अब्यूज करत आहेत.

पण अशा पद्धतीच्या कमेंट्स मला अजिबातच आवडत नाहीत. सर्वात पहिलं तर सून कधीच कोणत्या आईसाठी टाइमपास नसते. हा एक लेबल आहे ज्याला लोकं फक्त बॅगेजसारखं बघतात.

ती देखील एक व्यक्ती आहे. जिच्याकडे टाइमपास करण्याचा अधिकार आहे. मग ते पर्सनली असो किंवा प्रोफेशनली. मी आणि माझी आई एकत्रितपणे मुलांची चांगली काळजी घेत आहोत.

आईला किंवा मला कोणत्याच 'टाइमपास'ची गरज नाही. आईमुळे मला जगातील सगळं प्रेम मिळत आहे. तसेच मी देखील त्यांना तेवढंच प्रेम करतो. 'सून' आणणे हा काही पर्याय नाही. ही गोष्ट त्या लोकांना सांगत आहोत, जे माझ्या खासगी आयुष्याबद्दल आणि रिलेशनशिप्सबद्दल बोलत आहेत.

माझी मुलं अतिशय भाग्यवान आहेत. ज्यांना माझी आई प्रेम देते आणि गाइड करत आहे. मला माझ्या आयुष्यात लाईफ पार्टनरची गरज नाही जेव्हा गरज पडेल तेव्हा मी माझ्यासाठी लग्न करेन. मोकळेपणा दूर करण्यासाठी करेन लग्न. मला ऐकण्यासाठी आभार.

VIEW ALL

Read Next Story