जान्हवी राधिकाची मैत्री तर आहेच, पण अंबानी कुटुंबाची नातेवाईकसुद्धा

नेहा चौधरी
Jul 23,2024


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंगपासून लग्न सोहळ्याच्या प्रत्येक कार्यक्रमात जान्हवी कपूरची उपस्थितीत होती.


तुम्हाला हे माहितीच आहे की, राधिका मर्चंट आणि जान्हवी या मैत्रिणी आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जान्हवी ही अंबानी कुटुंबाची नातेवाईकदेखील आहे.


जान्हवी कपूरच्या आत्याच्या मुलाचं लग्न अनिल अंबानींच्या मेहुणीच्या मुलीसोबत झालाय.


अनिल अंबानी आणि बोनी कपूर हे जिवलग मित्र आहेत.


टीना अंबानीची बहीण भावना मोतीवाला यांची मुलगी अंतरा हिचं लग्न बोनी कपूर यांची बहीण रीना यांचा मुलगा मोहितसोबत झालंय.


मोहित हे अनिल अंबानींचे जावई असल्यामुळे जान्हवी आणि तिचं कुटुंब अंबानी कुटुंबासाठी महत्वाचे पाहुणे मानले जातात.


मोहित आणि अंतरा यांच्या लग्नासाठी श्रीदेवी आपल्या कुटुंबासोबत दुबईला गेल्या होत्या. तिथेच त्यांचं दुःखद निधन झालं होतं.

VIEW ALL

Read Next Story