डिवाईनचे खरे नाव विवियन फर्नांडिस आहे. 'ये मेरा बॉम्बे' हे गाणे रिलीज झाल्यानंतर त्याला लोकप्रियता मिळाली होती. त्याच्या आयुष्यावर गली बॉय नावाचा चित्रपटही आला होता. डिवाईन हा 8 कोटींहून अधिक संपत्तीचा मालक आहे.
बिग बॉसचा विजेता एमसी स्टॅनने 2018 मध्ये यूट्यूबवर त्याचे वाटा हे पहिले गाणे रिलीज केले होते. या गाण्याने त्याला रातोरात स्टार बनवले. कमी वयातही एमसी स्टॅनकडे सुमारे 15 ते 20 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
एमिवे बंटाईचे खरे नाव बिलाल शेख आहे. एमिवेने 2013 मध्ये यूट्यूबवर ग्लिंक लॉक हा पहिला ट्रॅक रिलीज केला होता. त्याच्याकडे 35 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. (फोटो - emiway bantai facebook)
बादशाहने हनी सिंगसोबत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर बादशहाने एकट्याने आपली ओळख निर्माण केली. त्याच्याकडे एकूण 39 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
रफ्तारचे खरे नाव दिलीन नायर आहे. रफ्तारने करिअरची सुरुवात डान्सने केली होती. नंतर त्याने रॅपला आपले करिअर म्हणून निवडले. त्याने बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. त्याची एकूण संपत्ती 80 कोटी आहे.
भारतात रॅप इंडस्ट्रीला लोकांपर्यत पोहचवण्यात हनी सिंगचा सर्वात मोठा हात आहे. त्याचे खरे नाव हिरदेश सिंग आहे. CAKnowledge.co नुसार, हनी सिंग 180 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.