'तो' आहे तरी कोण?

सलग 3 फ्लॉप चित्रपट देऊनही 'या' अभिनेत्याला मिळालं 1100 कोटींचं मानधन; 'तो' आहे तरी कोण?

अलिखित समीकरण

मुळात कलाकारांच्या या यश आणि अपयशाच्याच बळावर त्यांचं या कलासृष्टीतील भविष्य निर्धारित करण्यात आलं, जणू हे अलिखित समीकरणच. काही सेलिब्रिटी मंडळी मात्र या सुपरहीट आणि फ्लॉप चित्रपटांच्या वर्तुळात अडकलेच नाहीत.

सर्वाधिक मानधन

दक्षिणेकडील एका अभिनेत्याचं नाव या यादीत अग्रस्थानी आहे. सध्याच्या घडीला हा अभिनेता देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.

प्रभास

फक्त दाक्षिणात्य चित्रपटच नव्हे, तर हिंदी कलाजगतामध्येही या अभिनेत्याला प्रसिद्धी मिळाली आहे. त्याचं नाव आहे, प्रभास.

'बाहुबली' या आणि याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागामुळं प्रभासला कमाल प्रसिद्धी मिळाली. आंतरराष्ट्रीय सिनेसृष्टीतही त्याची वाहवा झाली.

6 वर्षे फ्लॉप चित्रपट

कारकिर्दीत अपयशाचा टप्पा मात्र त्यालाही चुकला नाही. बाहुबलीनंतर 6 वर्षे उलटूनही सुपरहिट चित्रपट देऊ शकलेला नाही. 'साहो', 'राधे श्याम', 'आदिपुरुष' या त्याच्या चित्रपटांनी समाधानकारक कमाई केली नाही, किंबहुना समीक्षकांनीसुद्धा या चित्रपटांना फटकारलं.

कोट्यवधींचं मानधन

सलगच्या अपयशानंतरही निर्माते मात्र प्रभासवर विश्वास ठेवताना दिसत आहेत. येत्या काळात प्रभास 'सलार'साठी 400 कोटी रुपये आणि 'कल्कि 2898 AD'साठी 700 रुपये मानधन घेणार आहे. थोडक्यात फ्लॉप असूनही त्याला 1100 कोटी रुपये इतकं मानधन देण्यात येणार आहे. झालात ना थक्क?

VIEW ALL

Read Next Story