नेत्यांची माप काढणारी काजोल शिकलीये तरी किती?
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल सध्या आपल्या नवनवीन वेबसिरीजमुळे चर्चेत आहेत. 90 च्या दशकात काजोलने आपल्या उत्तम अभिनयाने तसेच सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.
काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती रोज नवनवीन फोटो तिच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर करत असते.
सध्या काजोल तिच्या नवीन शोच्या प्रोमोशनसाठी व्यस्थ आहे. दरम्यान या मुलाखतीवेळी काजोलने असं काही विधान केलं ज्यामुळे चर्चांना उधाण आलं.
एका प्रश्नावर उत्तर देताना तिने देशातील होत असलेल्या राजकारण्यांच्या शैक्षणिक विषयावर बोट ठेवलं. तिने केलेल्या त्या वक्तव्यावर नेटकऱ्यानी तिच्यावर टीका केली.
काही अर्धशिक्षीत राजकारणी हा देश चालवत असल्याचं काजोलने म्हटलं होतं. तिच्या या विधानाने काजोल सध्या चांगलीच ट्रोल होत आहे.
सध्या सुरु असलेलता राजकारण्यांकडे देशाला पुढे नेण्याची दृष्टी नाही हे सांगायला सुद्धा लाज वाटत नाही, असं देखील काजोल म्हणाली होती.
मात्र नेत्यांची शिक्षण काढणारी अभिनेत्री काजोल हिचं शिक्षण किती झालंय? असं प्रश्न उपस्थित होत आहे.
पाचगणी येथे काजोल तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुलमध्ये काजोल शिक्षण घेत होती. पुढे वयाच्या 16 व्या वर्षी तिने बेखुदी हा पहिला चित्रपट साइन केला.
तिला पुढे चित्रपटात करियर करायचं होतं म्हणून तिने शाळा सोडली. मात्र तिला नृत्यास रस होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये आपला जम बसवला.