होम अलोन

तब्बल 31 वर्षांनंतर 'होम अलोन'मधील आई- मुलाची भेट; बापरे, हा चिमुरडा एवढा मोठा झालाय!

केविsssssन

Home Alone : केविsssssन अशी हाक येते आणि ही चिमुकला आणि त्याच्या मागंमागं असणारी आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी त्याची आईच आपल्या डोळ्यांसमोर येते.

एका क्षणात गतकाळात

'होम अलोन'मधील हाच केविन आणि त्याची ऑनस्क्रीन आई नुकतेच एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आले आणि चाहते एका क्षणात गतकाळात रमले.

आठवतोय होम अलोन...?

'तुला आठवतोय होम अलोन...?' असं विचारत अनेकांनीच कुतूहलानं अभिनेता मॅकाले कल्किन आणि अभिनेत्री कॅथरिन ओहारा यांचे हे फोटो पाहिले आणि शेअरही केले.

नात्याची सुरेख बाजू

यावेळी कॅथरिननं अतिशय प्रेमानं मॅकालेला पाहिलं, त्याचं स्वागत केलं. या दोघांच्याही नात्याची ही सुरेख बाजू पाहताना तिथं असणारे अनेकजण भावूक झाले.

आठवणी

ओहारानं या समारंभावेळी चिमुरड्या मॅकालेला 'होम अलोन' या चित्रपटाच्या दोन्ही भागांवेळी किती दडपण आलं होतं हेसुद्धा सांगत काही आठवणी शेअर केल्या.

केविनचं खरंखुरं कुटुंब

मॅकाले कल्किन, अर्थात होम अलोनमधील तो लहानगा आता बराच मोठा झाला असून त्याला दोन मुलंही आहेत. Brenda Song ही त्याची पत्नी असल्याचं सांगितलं जातं.

VIEW ALL

Read Next Story