इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन युदधाने संपूर्ण जगाला नरसंहाराचा क्रूर चेहरा दाखवला आहे.
देशभरातील सेलिब्रिटीज, नेतेमंडळी या युद्धाबाबत आपले विचार सोशल मीडियाद्वारे मांडत आहेत.
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली हिच्या वडीलांनी मात्र तिच्या इस्रायलविरुद्ध वक्तव्यावर निराशा व्यक्त केली आहे.
अँजेलिनाचे वडील अभिनेते जॉन वॉईट यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे, 'मी खूप निराश आहे की माझ्या मुलीला, इतर अनेकांप्रमाणेच, देवाच्या महिमेबद्दल, देवाच्या सत्यांबद्दल काहीच समज नाही.'
'येथे मुद्दा देवाच्या पवित्र भूमीच्या, यहुद्यांच्या भूमीच्या इतिहासाचा नाश करण्याचा आहे. ते पुढे म्हणाले, मूर्खांनो, इस्त्राईल ही समस्या आहे असे तुम्ही म्हणता? तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची आणि विचारण्याची गरज आहे: ‘मी कोण आहे? मी काय आहे?'
तर निर्वासितांना मदत करण्यासाठी युनायटेड नेशन्ससोबत काम करण्याच्या तिच्या अनुभवाचा उल्लेख करताना, अँजेलिना जोलीने सांगितले की 'तिचे लक्ष हिंसाचारामुळे हतबल झालेल्या लोकांकडे आहे.'
ती पुढे म्हणाली, 'इस्रायलमध्ये जे काही घडले ते दहशतवादी कृत्य आहे. परंतु गाझामधील नागरी लोकसंख्येच्या बॉम्बफेकीत गमावलेल्या निष्पाप जीवांचे समर्थन करू शकत नाही ज्यांना कुठेही जाण्याची सोय नाही, अन्न किंवा पाण्याची सोय नाही. आश्रय घेण्यासाठी सीमा ओलांडण्याचा मूलभूत मानवी हक्क हा त्यांना मिळायलाच हवा.'
जोलीचे वडील इस्रायलचे समर्थन करतात ; वॉईट हे इस्रायलचे आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे सुप्रसिद्ध समर्थक आहेत.
युनायटेड स्टेट्समध्ये, ते रिपब्लिकन पक्षाचे एक सदस्य आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात ते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक उल्लेखनीय वकील होते.