करण देओलच्या लग्नाची जोरदार चर्चा

बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या लग्नाला हजेरी लावणार आहेत.

हेमा मालिनी यांची चर्चा

पण यादरम्यान सर्वांचं लक्ष हेमा मालिनी यांच्याकडे आहे. हेमा मालिनी आपल्या सावत्र नातवाच्या लग्नाला हजर राहणार का? अशी चर्चा आहे.

हेमा मालिनी अनुपस्थित राहणार

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हेमा मालिनी करण देओलच्या लग्नाला अनुपस्थित राहणार आहे. याचं कारणही सांगण्यात आलं आहे.

...म्हणून लग्नाला जाणार नाही

सूत्रांच्या माहितीनुसार, हेमा मालिनी यांनी नेहमीच धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबापासून अंतर ठेवलं आहे. त्यामुळे त्या करणच्या लग्नात जाणार नाहीत.

इशा आणि अहाना राहणार हजर

दरम्यान, हेमा मालिनी यांच्या मुली इशा आणि अहाना मात्र आपल्या पतींसह लग्नात हजर राहणार आहेत.

सनी देओलकडून बहिणींना लग्नाचं निमंत्रण

सनी देओलने आपल्या बहिणींना लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे त्या थोड्या वेळासाठी लग्नात हजर असतील अशी माहिती आहे.

इशा देओल करणच्या संगीतला हजेरी लावणार

चर्चा आहे की, इशा देओल करणच्या संगीतला हजेरी लावणार आहे. तसंच ती स्पेशल डान्स परफॉर्मन्सही देणार आहे.

सनी आणि बॉबी होते बहिणींच्या लग्नाला हजर

सनी आणि बॉबी यांनी इशा आणि अहानाच्या लग्नाला हजेरी लावली होती.

दोन्ही पत्नींचं कुटुंब एकमेकांपासून अंतर ठेवून

धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. मात्र दोन्ही पत्नींचं कुटुंब एकमेकांपासून अंतर ठेवून आहे.

VIEW ALL

Read Next Story