हेमा मालिनीसाठी फार पजेसिव्ह होते धर्मेंद्र

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. एक वेळ अशी होती जेव्हा धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्याबद्दल फार पजेसिव्ह होते.

Sep 05,2023

सतत भांडणं

धर्मेंद्र यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, हेमा मालिनी यांच्याशी आपलं सतत भांडण होत असे. कारण ते त्यांना दुसऱ्या अभिनेत्यांसह पोझ देण्यास मनाई करत होते.

दुसऱ्या अभिनेत्यांसह पोझ देणं नापसंत

धर्मेंद्र यांनी सांगितलं होतं की, हेमाने दुसऱ्या अभिनेत्यांसह पोझ देणं मला आवडत नसे. पतीच्या या वागण्यावर हेमाही शांत बसत नसत.

दुसऱ्यांसह अशा पोझ देताना पकडलं

हेमा मालिनी यांनी सांगितलं होतं की, मी आपत्ती दर्शवू शकत नव्हती. पण मी अनेकदा त्यांना दुसऱ्यांसह अशा पोझ देताना पकडलं आहे.

दिवसाची सुरुवात भांडणाने

स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत हेमा यांनी सांगितलं होतं की, आमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात भांडणाने होतं. आम्ही नेहमी भांडत असतो. पण नंतर शांतही होतो.

अतूट नातं

पण या भांडणांनंतरही हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्यावर प्रचंड प्रेम करतात. ती आपली सर्वात आवडती व्यक्ती असल्याचं त्या सांगतात.

'नातं आपल्याकडून कायम राहील'

धर्मेंद्र यांच्याशी असलेलं नातं आपण कधीच तुटू देणार नाही असं हेमा मालिनी यांनी सांगितलं होतं. हे नातं आपल्याकडून कायम राहील असं त्या म्हणाल्या होत्या.

1980 मध्ये लग्न

हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्न केलं असून, तेव्हापासून त्यांचं नात अतूट आहे. त्यांना दोन मुली आहेत.

VIEW ALL

Read Next Story