'ही' लोकप्रिय अभिनेत्री आहे अतुल कुलकर्णीची पत्नी

अतुल कुलकर्णीची पत्नी

मराठी कलाजगतामध्ये गाजलेलं एक नाव म्हणजे अभिनेता अतुल कुलकर्णी. या अभिनेत्याची Better Half अर्थात त्याची पत्नी कोण आहे माहितीये?

गीतांजली कुलकर्णी

अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी ही अतुल कुलकर्णीची पत्नी आहे.

गीतांजली

एनएसडीमधून गीतांजलीनं या क्षेत्रातील शिक्षण घेतलं असून, स्वानंद किरकिरे, नवाजुद्दीन सिद्दीकी हे तिचे बॅचमेट्स आहेत. तर, अतुल तिचा सिनियर असल्याचं म्हटलं जातं. तो तिच्याहून 8 वर्षांनी मोठा आहे, असं गीतांजलीनंच एका मुलाखतीत सांगितलं होतं.

दिल्ली

दिल्लीमध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास असताना अतुलच तिचा आधार होता. गीतांजलीनं पुढाकार घेत अतुलवरील प्रेम व्यक्त केलं होतं. ज्यानंतर 1996 मध्ये या दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

निर्णय

लग्नाला 28 वर्षे उलटूनही गीतांजली आणि अतुलला मुलबाळ नाही. हा निर्णय आपण परस्पर सहमतीनंच घेतल्याची माहिती तिनं फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

गुल्लक

'गुल्लक' या सीरिजमुळं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या गीतांजली कुलकर्णीच्या खासगी आयुष्याची चर्चाही सुरु असून, ती अतुल कुलकर्णीची पत्नी असल्याचं कळताच अनेक चाहते आश्चर्यचकित होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story