Fathers Day : सेलिब्रिटींच्या खऱ्या आयुष्यातील हिरो, अभिनेत्रींनी दिला आठवणींना उजाळा

आई घराची सावली तर बाप घराचं छप्पर आहे, असं कायमच म्हटलं जातं. 16 जून हा दिवस जागतिक पितृदिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने सेलिब्रिटींनी देखील वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मुलींसाठी बाप कायमच हिरो असतो. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या वडिलांसोबत फोटो पोस्ट करत, फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मितवा फेम अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने तिच्या वडिलांसोबतचे फोटो पोस्ट करत फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री सायली संजीवने वडिलांसोबतचा तिच्या लहानपणीचा फोटो केला आहे. हॅप्पी फादर्स डे बाबा, असं म्हणत तिने बाबांसोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय.

रिंकू राजगुरुने लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. माझ्या आयुष्यातील पहिले हिरो म्हणजे माझे बाबा, असं कॅप्शन देत तिने फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या.

अ‍ॅनिमल फेम तृप्ती डिमरीने तिच्या वडिलांचा फोटो पोस्ट करत लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

अभिनेत्री स्पृहा जोशी हिने तिची बहिण आणि आई बाबांसोबतचा फोटो पोस्ट करत, फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या.

रात्रीस खेळ चाले मालिकेतून घराघरात पोहोचलेली शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमाळेकर. छोट्या अपूर्वाचा वडिलांनी हात पकडलेला फोटो पोस्ट करत, तिने फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या.

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाने तिच्या वडिलांचा फोटो पोस्ट फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या.

नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारा साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदना हिने वडिलांचा फोटो पोस्ट करत फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या.

VIEW ALL

Read Next Story