रिअॅलिटी शोजच्या सत्यतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. अमिताभ बच्चन यांचा केबीसी कार्यक्रमही यातून सुटलेला नाही.
सीझन 15 चा पहिला करोडपती जसकरन सिंहने या रिअॅलिटी शोची सत्यता सांगितली आहे.
जसकरन सिंह याने केसीबी फिक्स्ड किंवा स्क्रिप्टेड असण्याचे दावे फेटाळले आहेत.
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत जसकरन सिंहने सांगितलं की, जेव्हा लोकांना एखाद्या गोष्टीची माहिती नसते तेव्हा ते वेगवेगळे अंदाज लावतात.
'देशातील लाखो, करोडो लोकांनी केबीसीसाठी ऑडिशन दिलं आहे. सुरुवातीच्या फेऱ्या पार करणं किती कठीण आहे याची त्यांना जाणीव आहे'
'ज्या लोकांनी केबीसीसाठी प्रयत्न केला नाही, तेच लोक असे दावे करत असतात. पण असं काहीच नाही'
जसकरनने सांगितलं की 'हा शो मेरिटच्या आधारावर आहे. केबीसी स्क्रिप्टेड असल्याचे आरोप खोटे आहेत. अशा गोष्टींना खरं मानू नका'
जसकरनने केबीसीत येणाऱ्यांसाठी काही सल्लेही दिले आहेत. मेहनत आणि धैर्य याने सर्व काही मिळवता येतं असं त्याने सांगितलं आहे.
"हे केबीसीबद्दल नाही, पण आयुष्यातील मोठी शिकवण आहे. आपलं ध्येय नक्की करा, नंतर ते मिळवण्यासाठी मेहनत करा आणि मिळवा," असं जसकरनने सांगितलं.
"तुमचं नशीबही तेव्हाच तुमची मदत करेल जेव्हा तुमची पूर्ण तयारी असेल. ऑडिशन पार न केल्यास खचून जाऊ नका. नशीब तुम्हाला पुढे अजून संधी देईल," असं त्याने म्हटलं आहे.
पुढे त्याने सांगितलं की "केबीसी एक असा शो आहे, ज्याचा कोणताही अभ्यासक्रम नाही. त्यामुळे तयारी करत राहा. म्हणजे जेव्हा तुम्ही हॉट सीटवर असाल तेव्हा मोठी रक्कम जिंकू शकता".