'पठाण' चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर आता सर्वांना उत्सुकता आहे ती शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाची

किंग खान शाहरुखचा 'जवान' सात सप्टेंबरला हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे.

जवान चित्रपटाचा टीझरही समोर आला असून, या चित्रपटातील शाहरुखच्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे

टीझरमध्ये बॅकग्राऊंडला सुरु असलेल्या हाय-एनर्जी थंडर रॅप साँगने सर्व म्यूझिक लव्हर्सचं लक्ष वेधलं आहे.

हे रॅप गाणं प्रतिष्ठेच्या ग्रॅमी अॅवॉर्डमध्ये नॉमीनेशन मिळवलेल्या गायिका राजा कुमारीने गायलं आहे.

राजा कुमारही ही भारतीय वंशाची अमेरिकन रॅप सिंगर आहे. तिचं खरं नाव स्वेता यल्लाप्रगदा राव असं आहे.

पण म्यूझिक इंडस्ट्रीत ती राजा कुमारी नावाने प्रसिद्ध आहे. राजा कुमारी ग्वेन स्टेफनी, इग्गी अजालिया, फिफ्थ हार्मनी, नाइफ पार्टी, फॉल आउट बॉय या रॅप साँगने प्रसिद्ध झाली

राजा कुमारीने धर्मासंबंधी विषयात अभ्यास केला आहे. विशेषत: दक्षिण आशियातील धर्मांवर तिने अभ्यास केला आहे.

राजा कुमारीने ट्विटरवर शाहरुख खानसाठी एक पोस्ट केली होती, त्यात तीने मी शाहरुख खानवर प्रम करते असं म्हटलं होतं.

या ट्विटला शाहरुख खाननेही उत्तर दिलं होतं. आय लव्ह माय थंडर असं म्हटलं आहे. याशिवाय शाहरुखने रेड हार्ट इमोजीसुद्धा शेअर केला होता.

VIEW ALL

Read Next Story