मोनिका भदौरियाने गंभीर आरोप केल्याने मालिका पुन्हा चर्चेत आली आहे. यावर अद्याप असित मोदी यांची प्रतिक्रिया आलेली नाही.
तारक मेहता मालिकेतील प्रत्येक कलाकाराबरोबर अशा घटना घडत आहेत. पण मालिकेत काम करत असल्याने कोणी याबाबत बोलणार नाही.
परिस्थिती सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर अखेर मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. अशा जागी काम करण्यापेक्षा आत्महत्य केलेली बरं असा विचार करुन ही मालिका सोडली.
कॅन्सरने माझ्या आईचं निधन झालं पण असित मोदींनी सांत्वनाचा एकही कॉल केला नाही. उलट सात दिवसांनंतर सेटवर बोलवलं असल्याचा निरोप पाठवला
मी देव आहे, असं असित मोदी सेटवर सांगायते. माझ्याबरोबर गैरवर्तन केलं जायचं असं मोनिका सांगते. कॉल टाइमपेक्षा एक तास आधी सेटवर बोलावलं जायचं.
आपण शुटिंगच्या मनस्थितीत नसल्याचं सांगितल्यास तुला आम्ही पैसे देतो, सेटवर यावं लागेल असं उत्तर दिलं जात होतं.
आई रुग्णालयात आहे हे माहित असतानाही असित मोदी सकाळीच सेटवर बोलवायचे. खरं तर मालिकेत मोठी भूमिका नसताही सेटवर बसवून ठेवलं जायचं.
आपल्याबरोबर झालेल्या अन्यायाचा पाढाच मोनिकाने वाचून दाखवला आहे. आईचे कँसरवर उपचार सुरु होते. त्यामुळे रात्रभर आईभर रुग्णालयात राहावं लागत होतं.
तारक मेहता मालिका सोडलेल्या जवळपास प्रत्येक कलाकाराचे पैसे थकवण्यात आले असल्याचा आरोपही मोनिका भदौरियाने केला आहे.
मालिका सोडल्यानंतर केलेल्या कामाचे पैसे देण्यात आले नाहीत, जवळपास 4-5 लाख रुपये थकवण्यात आले. एक वर्ष यासाठी लढावं लागल्याचं मोनिका सांगते.
तारक मेहता मालिकेत मोनिका भदौरिया बावरीची भूमिका साकारत होती. पण 2019 मध्ये तीने या मालिकेला रामराम ठोकला.
त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. अभिनेत्री मोनिका भदौरियाने असित मोदींवर गंभीर आरोप केला आहे.
मिसेस सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्री बंसीवालनं मालिकेचे दिग्दर्शक असित मोदी यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
तारक मेहता का उल्टा चष्मा ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रियक मालिका आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ही मालिका वादात अडकली आहे.