2023 हे वर्ष किंग खान शाहरुखने गाजवलं. पठाणपाठोपाठ शाहरुखच्या जवानने बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली.

आता जवान चित्रपटाला आणखी एक कमाल केली आहे. जवानला अस्त्र फिल्म अँड क्रिएटिव्ह आर्ट्स अवॉर्ड मध्ये सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीत नामांकन मिळालं आहे.

हॉलिवूड क्रिएटिव्ह अलांयसने जगभरातील सर्वश्रेष्ठ चित्रपटांच्या नामांकनाची यादी जाहीर केली आहे.

'जवान'बरोबरच 'बार्बी', 'ओपेनहायमर', 'किलर ऑफ द प्लॉवर मून', 'जॉन विक', 'स्पायडरमॅन : अक्रॉस द स्पायडर वर्स' इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे.

अस्त्र फिल्म अँड क्रिएटिव्ह आर्ट्स अवॉर्ड या मानाच्या आंतरराष्ट्रीय फिचर फिल्ममध्ये नामांकन मिळवणार जवान हा एकमेव भारतीय चित्रपट आहे.

या पुरस्कार सोहळ्यातीव विजेत्यांची नावं 26 मे 2024 मध्ये अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये करण्यात येणार आहे.

शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाने देशभरात 632.24 कोटींची कमाई केली होती. 'जवान' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

VIEW ALL

Read Next Story